रत्नागिरी:- विजापूर (राज्य कर्नाटक) येथील तरुणाने धारतळे (ता. राजापूर) येथील काजू झाडाच्या फांदीला नॉयलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मल्लाप्पा तेवरेट्टी (वय २६, रा. अरकेरी शिददापूर, ता. तिकोटा, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास धारतळे-नाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मल्लाप्पा तेवरेट्टी हा सोमवारी (ता. १७) सकाळी दहाच्या सुमारास कर्नाटक येथून घरात कुणालाही न सांगता निघून गेला होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खबर देणार यांनी त्याचे लोकेशन पाठविले असता तो धारतळे येथे असल्याचे समजले. त्यांनतर नातेवाईकांनी त्याचा धारतळे-नाटे परिसरात शोध घेतला असता मल्लाप्पा याने काजूच्या झाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्या स्थितीत आढळला. या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.