रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मोबाईलची चोरी

रत्नागिरी:- रेल्वेच्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवासी महिलेचा चार्जिंगला लावलेला मोबाईल ट्रॅकवर पडला. अज्ञाताने तो चोरून नेला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार महिला जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना तिने १६ हजार ५०० रुपयांचा मोबाईल चार्जिंगला लावला होता. अनावधानाने तो ट्रॅकवर पडला. तेथून अज्ञात चोरट्याने तो पळविला. या प्रकरणी महिलेने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.