रत्नागिरी:- बेदरकारपणे रिक्षा चालवून दगडी गडग्याला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात रविवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शहरानजीकच्या शिरगाव-गांजुर्डा रस्त्यावर गुरुवार 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वा.घडली होती.
नदिम शौकत फणसोपकर (रा.साखरतर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार पृथ्वीराज देसाई यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,गुरुवारी नदिम आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-बीसी-0773) मधून प्रवासी घेउन भरधाव वेगाने रत्नागिरी ते गांजुर्डा असा जात होता.तो तेथील स्मशानासमोर आला असता रिक्षावरील ताबा सूटल्याने रिक्षेची धडक बाजुच्या दगडी गडग्याला बसून हा अपघात झाला.यात रिक्षा चालकासह प्रवाशांनाही दुखापत झाली असून रिक्षेचेही नुकसान झाले होते.याप्रकरणी चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337,338, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.