रत्नागिरी, सिंधुदुर्गला पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाच दिवसांचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.

जुलै महिना सुरू झाल्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळ कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने नुसता धुमाकूळ घातलाय. त्यातही गेल्या आठवड्यात पावसाचा जोर तसा कमी होता. त्यात बुधवार आणि गुरुवारी पावसानं विश्रांती सुद्धा घेतली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी 12 ते 16 जुलै या कालावधीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 13 ते 16 जुलै या कालावधीमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला.

या कालावधीमध्ये या दोन्ही जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे