रत्नागिरीत शासकीय सेवेतील ४ दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्रे

रत्नागिरी:- राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आली आहे. त्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व २०२३ नंतर सेवेत आलेल्या ३५९ कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रशासनस्तरावरून सुरू झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील ४ कर्मचाऱ्यांची बोगस प्रमाणपत्रे आढळली आहेत.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन आयएएस सेवेत समाविष्ट झाल्याचा आरोप पूजा खेडकर या तरुणीवर झाल्यानंतर आता अशी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व २०२३ नंतर सेवेत आलेल्या ३५९ दिव्यांग लोकांची पडताळणी करावी, असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले. सांगलीत ५, कोल्हापुरात ८, साताऱ्यात १२ तर रत्नागिरी जिल्ह्यात ८ उमेदवारांचे प्रमाणपत्रे तलाठी भरतीमध्ये पडताळणीत पात्र ठरवण्यात आले प्रमाणपत्र पडताळणीसाठी ही प्रकरणे संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात पडताळणीस पात्र असलेले ८ उमेदवार असून त्यांच्या पडताळणीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

जिल्हानिहाय अशी आढळली बोगस प्रमाणपत्रः सातारा १२, कोल्हापूर ११, पुणे २३, सिंधुदुर्ग ७,. मुंबई ६, सांगली १२ रत्नागिरी ४, रायगड १०, अहिल्यानगर ३०, छत्रपती संभाजीनगर ९, नाशिक ११, बीड ९, बुलढाणा ३०, धुळे ८, नागपूर ६, वाशिम १९, अकोला १९, लातूर ५, चंद्रपूर ६, हिंगोली ५, यवतमाळ ७, गडचिरोली १५, नांदेड १०, जळगाव ५, सोलापूर २०, ठाणे ९, भंडारा ९, पालघर ६, नंदुरबार ८, अमरावती १४, परभणी ४, जालना ३, वर्धा ३.