रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामाची त्रयस्थ तांत्रिक संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या या योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शहरातील नळपाणी योजनेचे काम कार्यारंभ आदेशापासून २ वर्षांत पूर्ण करायचे होते. परंतु, ५ वर्षे होत आली तरी कामे सुरूच आहेत. झालेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आहेत.
जलवाहिनी साडेचार फूट खोल अस आवश्यक असतानाही अनेक ठिकाण ती २ फुटांवर आहे. जलवाहिनीचा दर्जा योग्य नसल्याने वेळोवेळी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दोन वर्षांत या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर एक वर्ष योजना योग्यरीत्या संभाळून नगर परिषद कडे हस्तांतरित करणे आवश्यक होते. अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने अनेक अटींचा भंग केला आहे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांवर स्वतंत्र तांत्रिक संस्थेकडून चौकशी करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे माझी गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले आहे.