मिक्सरच्या इंजिनमध्ये हात गेल्याने तरुण जखमी

रत्नागिरी:- सिमेंट, वाळू, खडी, मिक्स करण्याच्या मशीनमध्ये तरुणाचा उजवा हात गेल्याने जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल मोतिराम चव्हाण (वय १८, रा. मेस्त्रीवाडी, परचुरी, ता. संगमेश्वर. मुळ: कर्नाटक ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास परचुरी व्हेळवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी अनिल चव्हाण हा परचुरी-संगमेश्वर येथील व्हेळवाडी येथे रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु होते. त्याठिकाणी तो सिमेंट, वाळू, खडी मिक्स करत असताना त्याने मशीन सुरु केले व इंजिनच्या चैनला ग्रीस लावत असताना अचानक त्याचा उजवा हात चेनमध्ये गेल्याने तो जखमी झाला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.