माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अंतरिम जामीन

खेड:- खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.त्यांच्या वतीने वकील अश्विन भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत दररोज पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

नगरपरिषदेच्या ठरावातील मुळ मजकुरात बदल करुन महत्वाच्या तपशीलाव्यतिरिक्त अधिकच्या मजुकराची नोंद घेत खोटा दस्तऐवज तयार केला. याप्रकरणी खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार कर्मचारी रूपेश एकनाथ डंबे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.