महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका व्हाव्या

बबन कनावजे; राष्ट्रवादी कॉंग्रेसची रत्नागिरीत आढावा बैठक

रत्नागिरी:-राष्ट्रवादी कॉंग्रेसची रत्नागिरी शहरामध्ये चांगली ताकद आहे. आगामी काळात त्यांना आणखी ताकद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या-त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीवर आवलंबून निवडणुकाचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांमध्ये रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका व्हाव्या, अशी आमची अपेक्षा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन कनावजे यांनी व्यस्त केले.  

शासकीय विश्रामगृत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, बशिर मुर्तुझा, सुदेश मयेकर, कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, बबलू कोतवडेकर, अभिजित हेगशेट्ये, महिला पदाधिकार आदी उपस्थित होते. श्री. कनावजे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून हा दौर आयोजित केले आहे. रत्नागिरी पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचीय काय स्थिता आहे, याची आढावा बैठक आज घेतली. सर्व पदाधिकारी उपस्थि होते. त्यांनी दिलेल्या आढाव्यानुसार राष्ट्रवादीची शहरात चांगली ताकद आहे. जिल्ह्यात यापूर्वी दोन आमदार होते. परंतु काहींनी आमदारकी, मंत्रीपदे भोगली आणि

दुसऱ्या पक्षात निघुन गेले. त्याचा फटका पक्षाला बसला परंतु पक्षावर प्रेम करणाने निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही पक्षाबरोबर आहेत. पक्ष वाढीसाठी आता भविष्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना ताकद दिला जाणार आहे. महिनाभरात हे बदल तुम्हाला दिसतील. खासदार सुनिल तटकरे, आदिती तटकरे या देखील रत्नागिरी दौऱ्यावर येथील सुनिल तटकरे लवकरच रत्नागिरी मेळावा घेतली. राज्यात सध्य जी राजकीय परिस्थिती सुरू आहे, त्यामुळे दरदिवशी नवीन काहीतरी घडत आहे. सरकार टिकेल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. तरी आम्ही स्वबळाची तयारी ठेवली आहे, पक्षावाढीच्यादृष्टीने जे प्रयत्न करता येतील ते केले जाती, असे श्री कनवाजे यांनी स्पष्ट केले.