रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. रविवारी झालेल्या बैठकीत हि निवड झाली आहे. किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेटला फायदा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदाचा मान रत्नागिरीला मिळताना रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांची या पदी वर्णी लागली आहे. याशिवाय शुभेंद्र भांडारकर सचिव, संजय बजाज खजिनदार तर संतोष बोबडे यांची सहसचिव पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड झाल्याने भविष्यात रत्नागिरीत रणजी तसेच आयपीएलचे सामने होऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड झाल्याने त्यांच्यात अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.