भाट्येत टेम्पोवर ट्रक पलटला; टेम्पोचालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- भाट्ये येथील अवघड वळणावर पावडरची वाहतूक करणारा ट्रक टेम्पोवर पलटी झाला. अपघातग्रस्त टेम्पो रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने निघाला होता. अपघातात टेम्पोचालकाचा टेम्पोमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. 

मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोळप येथून पावडर घेऊन ट्रक चालक सुनील कुमार तरसिमलाल ललहोत्रा (रा. पंजाब) रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. तर रत्नागिरीतून पूर्णगडच्या दिशेने अपघातग्रस्त टेम्पो निघाला होता. टेम्पोमध्ये चालक सिकंदर गावखडकर याच्यासह गालीफ पांढरे (वय ४५) आणि  प्रजाली प्रताप पेटकर ( सर्व रा. पूर्णगड) हे दोन प्रवासी होते.