रत्नागिरी:- बेदकारपणे दुचाकी चालवुन समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याप्रकरणी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार 11 जुलै रोजी सकाळी हा अपघात घडला होता. स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरून दोन्ही वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम मिलिंद पावसकर (21,रा.नाखरे, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.रविवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एस- 1009) घेऊन नाखरे ते पावस असा जात होता. तो भक्त निवास येथे आला असता त्याने समोरून येणाऱ्या (एमएच- 08- आर- 3360) या कारला उजव्या बाजूला जाऊन धडक देत हा अपघात केला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत.