रत्नागिरी:- आजाराला कंटाळून सनी फिनेल प्राशन प्यायलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल अनंत कांबळे (वय ४४, रा. बौद्धवाडी, कोतवडे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना ३१ जुलैला दुपारी पावणेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल हा मधुमेह आणि पॅनक्रीया या आजाराने त्रस्त होता. आजाराला कंटाळून त्याने सनी फिनेल प्राशन केले. नातेवाईकांनी तात्काळ त्याला कोतवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना त्याचा बुधवारी मृत्यू झाला.