परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली ५५ हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- परदेशात नोकरीला लावण्याचे आश्वासन देत ५५ हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार खेड येथे घडला आहे. याबाबत फिर्यादीकडून आजवर ५५ हजार स्वीकारून देखील नोकरी व व्हिसा न देता आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी येथील तीन संशयीत आरोपींवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या मुलाला परदेशात नोकरी मिळवून देण्याचे तसेच त्यासाठी आवश्यक व्हिसा मिळवून देण्याचे आमिष संशयीत तीन इसमांनी फिर्यादीना दिले होते. फिर्यादी नी या विश्वास ठेवून १९ जुलै २०२१ रोजी रक्क्म २०,००० रुपये, १ ऑगस्ट २०२१ रोजी रक्क्म २८,००० आणि २२ ऑगस्ट २०२१ रोजी रक्क्म ७,६६० रुपये असे एकुण ५५,६६० रुपये संशयीत आरोपींनी ऑनलाईन स्वरुपात स्विकारली होती. मात्र संशयितांनी रक्कम स्वीकारून तब्बल २० महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही नोकरी किंवा व्हिसा यापैकी कोणतीच गोष्ट फिर्यादीना दिली नाही.

संशयिताना याबाबत वारंवार विचारणा करून देखील मुलाला परदेशात नोकरी मिळवून देण्यास संशयीत टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीनी संशयीत आरोपींकडे दिलेली रक्कम परत मागितली मात्र ती त्यांना परत न दिल्याने फिर्यादीनी आपली आर्थिक लुबाडणुक झाल्याचे लक्षात आल्याने संशयितांविरुद्ध येथील पोलीस स्थानकात आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.