परतीच्या पावसाचा बळी; अंगावर वीज पडून महिला ठार

रत्नागिरी:- मौजे तुळसणी ता. संगमेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने पहिला बळी घेतला आहे. सायंकाळी ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या लखलखकाटात आलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे.

परतीच्या पावसात मंगळवारी संध्याकाळी साडे चार वाजता वीज कोसळून श्रीमती रियाना दिलावर मुकादम (वय अंदाजे 45 वर्षे) ह्या ठार झाल्या आहेत,
वीज कोसळून जखमी झाल्यावर त्यांना देवरूख येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्या मयत झाल्याचे सांगितले, परतीच्या पावसाने मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी विजा ही चमकत आहेत. काही ठिकाणी वीज गेलेली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.