संगमेश्वर:- मौजे करजुवे दुर्गवलेवाडी येथे नमन कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना रिक्षा पलटी झाली. या अपघातात 1 महिला ठार व 2 जण जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील पिरदवणे -किंजळकरवाडी येथे घडली.
संदीप हरिश्चंद्र किंजळकर यांच्या रिक्षातून भामटे कुटुंब मौजे करजुवे दुर्गवलेवाडी येथे नमन पाहण्यासाठी जात होते. पिरदवणे – किंजळकरवाडी येथील उतारावर रिक्षाचा ताबा सुटल्याने साईटपट्टीलगत असलेल्या झाडाला धडक देत रिक्षा २० फुट खोल कोसळली. हा अपघात एवढा मोठा होता की, तीन प्रवाशांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
प्रांजल प्रदीप भामटे ( ३५ ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अर्चना अनंत भामटे ( ५० ), हरिश्चंद्र किंजळकर ( ५० ) हे दोघे जखमी झाले आहेत.
या बाबत ओंकार सुरेश भामटे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणेचे पोलिस कॉन्स्टेबल सी. टी . कांबळे हे करत आहेत .