रत्नागिरी: मिर्या-नागपूर महामार्गावर दाभोळे घाटात मंगळवारी गॅस टँकर उलटला होता. अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसर्या टॅंकरमध्ये शिफ्ट करण्याच्या कामामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानची वाहतूक साखरपा-देवरुख मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरण्याचे काम यंत्रणेने सुरु केले आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान दाभोळे घाटात अवघड वळणावर निसरडया रस्त्यावर गॅस टँकर दि.१८ जून रोजी उलटला होता. आज गुरुवारी दुपारी अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसर्या टॅंकरमध्ये शिफ्ट करण्यास सुरुवात केल्याने अवजड वाहने पाली दरम्यान थांबवण्यात आली तर साखरपाकडून येणारी वाहने साखरपा देवरुख मार्गे रत्नागिरीकडे वळवण्यात आली. कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने पालीपासून थांबवण्यात आल्याने लांबचलांब रांगा लागल्या होत्या.