दापोली:- दापोली तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत असताना तोंडाला मास्क न लावत मिरवणूकित सहभागी 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तहसीलदार कार्यालय समोर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, विजयोत्सव साजरा करून घोषणाबाजी करत असताना तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी खालिद अब्दुल रखांगे, मेमन अरिफ गफूर, अनवर अब्दुल गफूर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिवगण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रविंद्र गंगाराम शिरसागर, अजीम मोहम्मद चिपळूणकर व इतर 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुहास पाटील यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.