‘त्या’ तोतया पोलिस महासंचालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- सहा दिवसांच्या कोठडीनंतर तोतया पोलिस महासंचालकाला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आबिद जाकर (२५, रा. राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. पहिल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले होते. आरोपीच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर १८ जानेवारी रोजीच सुनावणी होणार आहे.

आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आबीद जाकर या आरोपीला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने जामिनीसाठी अर्ज दाखल केला असून त्यावर १८ जानेवारी रोजीच सुनावणी होणार आहे.