खेड:- तालुक्यातील तळे देऊळवाडी येथे झालेल्या कार व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार प्रदीप प्रकाश ढेबे (वय-२१, रा. वावे – धनगरवाडी, ना. खेड) हा ठार झाला आहे. हा अपघात दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १:३० वाजता घडला.
या अपघाताची फिर्याद भरत वसंत निकम (वय-३८,पोलीस पाटील,रा. तळे-कासारवाडी,ता.खेड)यांनी
दिल्यानुसार पोलिसांनी
दि.२६ डिसेंब
र २०२४ रोजी संध्याकाळी ७:३६ वाजता कारचालक अशोक दत्ताराम
सकपाळ (रा.तळे- म्हसोबाची वाडी, ता.खेड)
याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ४१६/ २०२४, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१
), २८१, १२५(ब),मोटार वाहन कायदा कलम-१८४
प्रमाणे
गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. खेड
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
अशोक
दत्ताराम सकपाळ याने त्याच्या ताब्यातील फोर्ड फियस्टा एम. एच. ४३, ए. एल. ९०३३ गाडी मांडवे ते खेडकडे भरधाव वेगात, अविचाराने, बेदरकारपणे चालवून मागून येणारी बजाज प्लाटीना गाडी नं.एम एच. ०८. बी. बी. १९७३ वरील चालक प्रदीप प्रकाश ढेबे याच्या वाहनाचा अपघात करून त्याच्या मृत्युस व दोन्ही गाड्यांच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.