तळेकांटे येथे स्वीफ्टची इनोव्हाला धडक, ३ जखमी

संगमेश्वर:- मुंबई – गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे स्वीफ्ट कारने विरुध्द दिशेला जावून इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. नीतीन मनोहर खातू (५६, नावडी बाजारपेठ म, संगमेश्वर), सदफ इम्रान खान (३५), तुबा इम्रान खान (१३, दोन्ही राहणार कुर्ला, मुंबई ) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , महंमद इम्रान साजिद खान (३८, कुर्ला मुंबई ) हा आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कार रत्नागिरी ते मुंबई असा जात असताना तळेकांटे स्मशानभूमी येथे समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा गाडीला विरुद्ध दिशेला जावून जोरदार धडक दिली या अपघातात तिघेजण जखमी झाले याबाबतची फिर्याद नीतीन खातू यांनी (५६, नावडी, संगमेश्वर ) यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली त्यानुसार स्वीफ्ट कार चालक महंमद खान यांच्यावर मादविकलम २७९, ३३७ मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.