रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान झोपलेल्या तरुणीची पर्स खेचून अज्ञाताने लांबवली. पर्समधील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि तरुणीच्या मोेबाईलव्दारे तिच्या बँकेखात्यातून 1 लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर करुन तब्बल 2 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरीची ही घटना 5 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 वा.मेंगलोर एक्सप्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन पासून काही अंतरावर पुढे घडली.
याप्रकरणी प्रतिमा रणजीत सोंधिया (28) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवार 5 ऑगस्ट रोजी प्रतिमा सोंधिया ही मेंगलोर एक्सप्रसेने पती व मुलांसह प्रवास करत होती.प्रवासादरम्यान तिने आपली पर्स खाद्यांला अडकवून झोपी गेली होती.त्यावेळी अज्ञात चोरट्याने तिच्या झोपेचा फायदा उठवत पर्स खेचून चोरुन नेली.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.