रत्नागिरी:- जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत नियमित वाढ होत आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 86 वर पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी सापडलेले चार नवीन रुग्णांपैकी तीन कामथे तर एकजण कळंबणी येथे क्वारंटाईन करण्यात आला होता. जिल्ह्यात ‘होम क्वारंटाईन’ केलेल्यांची संख्या 10,695 इतकी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला साधारण एक हजारपेक्षा अधिक गाड्या जिल्ह्याच्या सीमेवर दाखल होत आहेत.त्यामुळे चाकरमान्यांची संख्या वाढली आहे.
यातच यापूर्वी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल येऊ लागले आहेत. नियमित अहवाला किमान चार ते पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. शुक्रवारी रात्री पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये खेड कळंबणी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये खेड दहिवली येथील 2, दापोलीतील 2 तर राजापुरातील एकाचा समावेश आहे.