जिल्ह्यात चोवीस तासात 94 नवे रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 94 नवे रुग्ण सापडून आले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 44 तर अँटिजेन टेस्ट केलेले तब्बल 50 रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 881 वर पोचली आहे. 
 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील चोवीस तासात कोरोनाचा जिल्ह्यात एकही बळी गेला नाही ही दिलासादायक बाब असली तरी 24 तासात तब्बल 94 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
 

नव्याने सापडलेल्या 94 रुग्णांमध्ये सर्वाधिक 50 रुग्ण हे अँटिजेन टेस्टमधील आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 10 रुग्ण, दापोलीतील 10, गुहागर 9, चिपळूण 8, लांजा 2 आणि खेड येथील तब्बल 11 रुग्णांचा समावेश आहे. तर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये रत्नागितील 13, दापोली 2, गुहागर 2, चिपळूण 3, संगमेश्वर 17, राजापूर 2, लांजा तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.