रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर खाली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 73 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाण देखील वाढून 92.01 टक्क्यांवर पोचले आहे.
नव्याने सापडलेल्या 18 रुग्णांमध्ये आरटिपीसीआर टेस्ट केलेल्यांपैकी 16 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 2 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील 5 आणि रत्नागिरीतील 11 रुग्णांचा समावेश आहे. तर लांजा तालुक्यातील एका 72 वर्षीय वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 231 वर पोचली आहे. तर सोमवारी तब्बल 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 45 हजार 743 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत 7 हजार 576 जणांनी कोरोनावर मत केली असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढून 92.01 टक्क्यांवर पोचला आहे. आता पर्यंत 305 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.70 टक्क्यांवर आहे.