जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत 29 जुलैला 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत आता 29 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीच्या प्रवर्गात काही बदल देखील प्रशासनाने सूचित केला आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2022 च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यक्रमामधील परिच्छेद 1 मधील अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती स्त्रियांच्या आरक्षणासह) या मजकूराऐवजी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच  आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 28 जुलै ऐवजी 29 जुलै अशी दुरुस्ती करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कळविले आहे.