रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड गणेशवाडी येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. संशयिताकडून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश अनंत भुवड (वय (३४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी पावणे एकच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जयगड गणेशवाडी येथील एका पडक्या सरकारी गोदामाजवळ जुगार खेळवत असताना सापडला. त्याच्याकडून साहित्यासह ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.