जयगड येथील महिलेच्या खुनाप्रकरणी आरोपीला बेड्या

रत्नागिरी:- जयगड  डेक्कन ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीचे आवरातील गेस्ट हाऊस मध्ये झालेल्या महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

१४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४.१५ वा. च्या दरम्यान रुम नं ४  डेक्कन ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीचे आवरातील गेस्ट हाऊस, जयगड या खोलीत  ३२ वर्षे वय असलेली महिला दीक्षा मिस्त्री ही जखमी व बेशुध्द अवस्थेत आढळुन आली हाेती  या खोलीला बाहेरुन कडी लावलेली होती. त्या महिलेस झालेल्या जखमांचे निरीक्षण करता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसुन आले. त्यांना औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले परंतु त्यांचा औषधोपचारादरम्यान मृत्यु झाला. सदर घटनेबाबत जयगड पोलीस ठाणे येथे मृत महिलेचे  चुलत सासरे  यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा  गुन्हा दाखल करणेत आला.

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या गुन्हयातील अज्ञात आरोपीत याचा शोध घेवून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तसेच जयगड पोलीस ठाणेकडील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही या गुन्ह्याचा  समांतर तपास चालू होता.
स्था.गु.अ.शाखा व जयगड पोलीस ठाणे असे जयगड व रत्नागिरी शहर परिसरात अज्ञात आरोपीत याचेबाबत माहीती घेत असताना या गुन्ह्रांत मारुती राजाराम मोहिते-पाटील, वय ५५ वर्षे, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हा संशयित इसम असल्याचे समजुन आले. त्याचा शोध घेता, तो घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे आला असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार व जयगड पोलीस ठाणे यांचे संयुक्त तपास पथकाने तात्काळ कोल्हापूर जिल्ह्रांत जाऊन मध्यरात्री संशयीत आरोपी मारुती राजाराम मोहिते-पाटील, वय 55 वर्षे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील गुन्हयाचे संदर्भाने चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. सदर गुन्ह्रांत त्यास आज सकाळी ७.१५ वाजता अटक केलेली आहे. शनिवारी सदर अटक आरोपी मारुती राजाराम मोहिते-पाटील यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास २२पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. सदर गुन्ह्रांचा तपास सहा. पो. निरीक्षक श्री नितीन ढेरे हे करीत आहेत. 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई व श्री. सदाशिव वाघमारे , उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी  यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी तसेच जयगड पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोहेकॉ. शांताराम झोरे, मिलिंद कदम, आशिष शेलार, पोना रमिज शेख, उत्तम सासवे तसेच जयगड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संदीप साळवी, पोकॉ विनय मनवळ, मधुकर सरगर, बाळकृष्ण खोत यांनी केलेली आहे.    यातील अटक आरोपीने कोणताही सुगावा मागे न ठेवता, पलायन केले असले तरी, त्यास शोधुन अटक केल्याबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.