चौधरी ग्रामीण, सासणे वाहतूक तर हेमंतकुमार शाह एलसीबीचे नवे अंमलदार; 13 जणांच्या नियुक्या

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पाच पोलीस निरीक्षकांसह आठ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना नव्याने नियुक्त्या दिल्या आहेत. यात विनीत चौधरी यांची ग्रामीण, शिरीष सासणे यांची वाहतूक शाखा तर हेमंतकुमार शाह यांची एलसीबीला नियुक्ती करण्यात आली आहे.
 

बदली होऊन नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या आणि जिल्ह्यात बदली पात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सिंधुदुर्गातुन रत्नागिरीत आलेले विनित चौधरी यांना ग्रामीण पोलीस स्थानकात नियुक्ती देण्यात आली आहे. संजय आंबरे यांची नियंत्रण कक्ष येथून पोलीस कल्याण शाखा, शिरीष सासणे यांची एलसीबी येथून वाहतूक शाखा, अनिल गंभीर यांची लांजा पोलीस स्थानक, हेमंतकुमार शाह यांची एलसीबी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच पोलीस निरीक्षकांसह आठ सहायक पोलिस निरीक्षक यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नितीन ढेरे यांना जयगड पोलीस स्थानक, तुषार पाचपुते वाचक शाखा, जगदीश कळेकर सागरी सुरक्षा, शहाजी पवार मंडणगड पोलीस ठाणे, गणेश सावर्डेकर दाभोळ पोलीस ठाणे, प्रकाश बाईंग देवरुख पोलीस ठाणे, नजीब इनामदार खेड पोलीस ठाणे, संदीप वांगणेकर यांची रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.