चिपळूण:- गाडीची काच फोडून 10 हजार रुपयाची रक्कम लांबवल्याची घटना तालुक्यातील धामणवणे-खोतवाडी येथे घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार कैलास विश्वकर्मा (खेर्डी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद संतोष यशवंत गुजर (45, धामणवने-खोतवाडी) यांनी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गुजर यांनी 15 मार्च रोजी भालचंद्र दिवाडकर यांच्या घराशेजारी पार्किंग शेडमध्ये इको गाडी पार्किंग करुन ठेवली होती. या गाडीच्या डॅशबोर्डमध्ये 10 हजार किंमतीची रक्कम राहिली होती. ही रक्कम शिवकुमार विश्वकर्मा याने गाडीची काच दगडाने फोडून चोरुन नेली. या चोरीप्रकरणी विश्वकर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.