गोळप येथील अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे वाहन चालवून नेपाळी पादचारी तरुणाला धडक देत अपघात केला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.गोळप उतारात घडली आहे.

रामप्रसाद भागिराम चौधरी (52,मूळ रा. नेपाळ सध्या रा.गोळप, रत्नागिरी ) असे अपघातात जखमी झालेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. याबाबत बाग मालक प्रसाद अनंत यादव (56,रा.रत्नागिरी ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार,रामप्रसाद चौधरी 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.गोळप उतारातून चालत जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक देत अपघात केला. यात रामप्रसादच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.