गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम

रत्नागिरी:- दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्न आणि औषध प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात होणार्‍या भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अन्नपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूचनांच्या पालनात टाळाटाळ करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सणासुदीला तेल-तूप, मिठाई, दूध-दुग्धजन्य पदार्थ, रवा, मैदा, बेसन यांसारख्या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्याचाचा फायदा घेत उत्पादक अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. असे प्रकार रोखण्यासाठी दरवर्षी सणासुदीच्या काळात  ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते.
यंदाही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने काही सूचनाही केल्या आहेत. ग्राहकांपर्यंत सुरक्षित अन्नपदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी विक्रेते आणि उत्पादकांची आहे. त्यामुळे त्यांनाही सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे