रत्नागिरी:- शहरानजिकच्या खेडशी येथील बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जुलै ते 3 ऑगस्ट 2023 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी सुभाष रामचंद्र कडवेकर (66, रा. खेडशी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,15 जुलै रोजी दुपारी 2 वा. ते घर बंद करून कुटुंबासह मुंबईला गेले होते. ते 3 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत परतले असता त्यांना आपल्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडे उचकटलेले दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.कडवेकर यांनी तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.