खेड:- शहरातील भाऊसाहेब पाटणे संकुलासमोर उभ्या केलेल्या एका दुचाकीच्या डिकीतून, दोन अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखले करण्याची प्रक्रिया येथील पोलीस ठाण्यात सुरू होती. एका पतसंस्थेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जमा केलेली रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डिकी उघडून रोकड असलेली बॅग काढून घेत पोबारा केला. दुचाकीवरून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.