कुवारबाव येथे विकृताकडून गाईवर कुदळीने वार

रत्नागिरी:- रत्नागिरी कुवारबाव येथे गाभण गाईवर कुदळीने घाव घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावाला शांत केले.

सध्या कुवारबाव परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. तसेच अनिल अर्जुन वाडकर नामक व्यक्तीने हे कृत्य केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्या जखमी गाईवर गो सेवा संघाच्या गो शाळेत उपचार सुरु असून त्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे गाईच्या पायाना इजा झाली असून पाय पूर्णपणे अधू झाले आहेत.