रत्नागिरी:- राजापूरहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटीबसने कापडगाव येथे मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल शरद नाकीर (३६) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना २८ डिसेंबरला २०२४ ला मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित एसटी चालक सुनिल नाकीर हे एसटी बस (क्र. एमएच-०९ एफएल ०३७०) घेऊन राजापूर डेपोतून रत्नागिरीकडे प्रवासी घेऊन येत होते. रस्त्याचे कामकाज सुरु असल्याचे माहित असूनही निष्काळजीपणे एसटी चालवून पुढे जाणारी मोटार (क्र. एमएच-०३ एझेड ११६४) ला एसटी डाव्या बाजूला घेत असताना मोटारीला धडक देऊन अपघात केला. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार तृप्ती सावंतदेसाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.