रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पुरूष व स्त्री आरोग्य कर्मचार्यांच्या तसेच एनएनएम कर्मचार्यांच्या समस्यांची पूर्तता करण्यासाठी अजूनही कोणत्याही प्रकारची दखल शासनस्तरावरून घेतली जात नाही. कोविड काळात तरीही हे कर्मचारी उत्तमप्रकारे सेवा देत असून महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
त्याबाबत जि.प.आरोग्य अधिकारी डॉ. बबित कमलापूरकर यांना निवेदन दिले आहे. कोरोनाची स्थिती गंभीर बनलेली आहे. अशा परिस्थितीतही आरोग्य विभागातील सर्व संवर्गीय पुरूष व स्त्री आरोग्य कर्मचारी उत्तम पकारे कर्तव्य व जबाबदाऱया पार पाडलेल्या आहेत. परंतु आमचा पलंबित व विद्यमान समस्यांबाबत शासनस्तरावर कोणत्याही पकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सर्व कामकाजाचे अहवाल वरिष्ट कार्यालयात सादर करण्याबाबत आंदोलन अहवाल न देताना करण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे या संघटनेने सांगितले आहे.
त्याचवेळी पाथमिक आरोग्य केंद्र आंजर्ला (दापोली) येथे आरोग्य सहाय्यक या पदावर काम करत असलेले संदिप गुणाजी शिगवण यांचे कोविड मध्ये काम करत असताना निधन झाले होते. कै. शिगवण यांच्या कुटुंबाला 50 लाखांचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी दिलेले होते. संघटनेनेही त्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार झालेल्या पाठपुराव्यामुळे शिगवण यांच्या कुटुंबाला विमा संरक्षणाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकाऱयांच्या कार्यवाहीबाबत समाधान संघटनेचे अध्यक्ष पफुल्ल केळसकर, कार्याध्यक्ष मोहन सातव, सचिव श्रीशंकर केतकर यांनी समाधान व्यक्त केले.