दापोली:- दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दाभोळ पोलिसांनी छापा टाकत गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट-या व रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१/०२/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी ओकार नथुराम बालगुडे, वय ३१ वर्षे, रा. मधलीवाडी, आगरवायंगणी, ता. दापोली यांचे राहते घरी गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट-या व रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या आढळुन आल्या गैरकायदा व बिगरपरवाना बाळगले स्थिती मिळून आला. एकुण ४४००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आदा आहे.
यामध्ये २०००/- एक गावठी बनावटीची एका नळीची बंदूक, २०००,००/- एक काळसर व लाल रंगाची प्लास्टिक व लोखंडी बॉडी असलेली एअर पिस्टल, १००/- एक काळसर राखाडी रंगाची एमझेड कंपनीची एम९६१ मॉडेल असलेली तिला लाल बटणे असलेली चार्जिगची बॅटरी, १००/- एक क्राळसर रंगाची समोर व बाजूला लाइट व वरती लाल बटण असणारी हॅडल असणारी बॅटरी श, २००/- एक काळसर रंगाची समोर लाईट असणारी गोलाकार बॅटरी, ६००/- किंमतीच्या दोन लाल रंगाच्या प्लास्टिक आवरण असलेल्या रिकाम्या काडतुस आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले असुन यापुढील तपास दाभोळ पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.